Home महाराष्ट्र भाजप किंवा महायुतीकडून तिकीट मिळाल्यास मीरी जिल्हा परिषद गटात ताकदीने निवडणूक लढवणार...

भाजप किंवा महायुतीकडून तिकीट मिळाल्यास मीरी जिल्हा परिषद गटात ताकदीने निवडणूक लढवणार पत्रकार सन्मान सोहळ्यात डॉ. नंदकिशोर नरसाळे यांची स्पष्टोक्ती

भाजप किंवा महायुतीकडून तिकीट मिळाल्यास मीरी जिल्हा परिषद गटात ताकदीने निवडणूक लढवणार पत्रकार सन्मान सोहळ्यात डॉ. नंदकिशोर नरसाळे यांची स्पष्टोक्ती

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) भारतीय जनता पक्ष आणि महायुती कडून मीरी जिल्हा परिषद गटात तिकीट मिळाल्यास ताकदीने निवडणूक लढविणार असल्याची स्पष्टोक्ती डॉक्टर नंदकुमार नरसाळे पाटील यांनी दिली. ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून मिरी येथील हॉटेल देशमुख वाडा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.डॉ नरसाळे हे सामाजिक कार्यकर्ते असुन त्यांचा वैद्यकीय व्यवसाय ,हॉटेल व्यावसाय आहे.इतर ही अनेक उद्योग क्षेत्रात ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्यकर्ते डॉ.नंदकिशोर नरसाळे यांनी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील पत्रकारांचा यथोचित सन्मान करून नरसाळे परीवाराच्या वतीने उपस्थित पत्रकारांना भेटवस्तूसह प्रितीभोजन देऊन गौरव केला आहे.या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नरसाळे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.मला मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून मी हिंदुत्वाच्या विचाराचा पुरस्कर्ता आहे. आतापर्यंत मी फक्त भजपा व महायुतीतील घटक पक्षांनाच मतदान केले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षांकडून मला उमेदवारीसाठी विचारणा झाल्यास आपण संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत डॉ.नंदकिशोर नरसाळे यांनी दिले आहेत. महायुती मध्ये अगोदर उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असताना डॉ नरसाळे यांची ही त्यात भर पडली आहे.त्यामुळे मीरी जिल्हा परिषद गटात महायुती कडून अजून एक भिडू तयार झाला आहे.डॉ.नरसाळे म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे सरकार असताना देखील मागील निवडणुकीत मिरी जिल्हा परिषद गटात भाजपाच्या उमेदवाराचा झालेला पराभव ही पक्षाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आणि अती संवेदनशील बाब आहे.त्यामुळे यावेळी पक्षश्रेष्ठींनी मागिल सर्व बाबींचा विचार करून नवीन सुशिक्षित युवकांना प्राधान्य द्यावे.पक्षाची उमेदवारी देताना सर्व गुण संपन्न असा उमेदवार निवडावा की ज्यांच्या मागे लोकांचा मोठा जनसमुदाय आहे.त्यांच्याकडे एक गठ्ठा मते आहेत अशाच सक्षम उमेदवाराला संधी द्यावी मागिल निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना उमेदवारी न देता नवीन चेहऱ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी असे मत डॉक्टर नंदकुमार नरसाळे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डॉ.नरसाळे यांनी आपल्या सौभाग्यवतीला अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी जिल्हा परिषद गटातून निश्चितच निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू करून निवडणूकीचे अप्रत्यक्ष रीत्या रणशिंग फुंकले आहे.डॉ.नरसाळे हे राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संबोधले जातात.तसेच भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील व शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्याशीही त्यांचा वैचारिक व घनिष्ठ संपर्क आहे.तसेच डॉक्टर नरसाळे परीवाराचे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याशी व अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याशी देखील अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे डॉ.नरसाळे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असले तरी ऐनवेळी महायुतीतील कोणत्या घटक पक्षाकडून ते निश्चितच उमेदवारी स्वीकारणार हे त्यांच्या हालचाली वरून स्पष्ट झाले आहे.या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली नसली तरी ते निवडणुकीच्या रिंगणातील खेळाडू आहेत ही बाब आता पत्रकारांच्या नजरेतून लपून राहीलेली नाही. परंतु या निवडणुकीत ते नेमके कोणत्या पक्षाचे निवडणूक चिन्ह घेऊन लढणार हे त्यांनी अजूनही पडद्या आडच ठेवले आहे.सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन आहे. परंतु त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रथम पत्रकार दिनानिमित्त आयोजन करत पत्रकार सन्मान सोहळा साजरा करून राज्यात एक नंबरचा नाव लौकीक मिळवला आहे.पत्रकार दिनाचे औचित्य साधून झालेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात अहिल्यानगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर सुनिल नजन,पाथर्डी तालुक्यातील पत्रकार अशोक मोरे,रमेश पाथरकर,विलास मुखेकर,वजीर शेख,सचिन नन्नवरे, तुळशिदास मुखेकर,भिवसेन टेमकर,अंबादास गोरे,संतोष नन्नवरे इत्यादी पत्रकारांचा शाल,श्रीफळ,पेन, डायरी,बुके,आणि किंमती भेट वस्तू देऊन डॉक्टर नंदकुमार नरसाळे यांनी राज्यात व जिल्ह्यात सर्व प्रथम पत्रकारांचा मोठा गौरव करण्याचा मान मिळवला आहे.

Don`t copy text!