के.सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिन साजरा
के.सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिन साजरा.—- खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र दिनासोबतच 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे.महाराष्ट्र दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम कौशल्य विकास विभाग प्रमुख प्रा. संजय पावडे,ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील,अकॅडमिक डीन् डॉ सी एस पाटील, आय क्यू ए सी समनव्यक प्रा. कल्पेश महाजन, एच आर. विभाग प्रमुख प्रा.श्रुतिका घरडे, शारीरिक शिक्षण क्रीडा संचालक प्रा.नितीन चौधरी,सर्व विभाग प्रमुख,प्राध्यपक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी ,नागरिक उपस्थित होते.