कोपरे येथे अखंड हरिनाम सप्ताहा नंतर पाडव्याच्या मुहूर्तावर संत बाळूमामा मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
वै.संत भगवानबाबा,वै. संत वामनभाउ,वै.संत नारायण महाराज,वै.यादवबाबा यांच्या कृपा आशिर्वादाने
संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्याच्या निमित्ताने कोपरे येथे संत बाळूमामा मंदिरात अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर आणि ह.भ.प. महेश महाराज आव्हाड यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक १५ते१९ मार्च या कालावधीत हा सोहळा संपन्न झाला.दररोज काकडा भजन,हरीपाठ, आणि हरी किर्तन या प्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले. ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसिंग, बाबासाहेब महाराज मतकर, वैष्णवी ताई वाघमोडे, आदिनाथ महाराज निकम, महेश महाराज आव्हाड,यांची किर्तने झाली.बुधुवार दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता दिंडी प्रदक्षिणा झाली.गुरूवार दिनांक १९मार्च २०२६ रोजी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ते१ या वेळेत ह.भ.प.सुरेशानंद महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन नानाभाऊ, नवनाथ, जबाजी उघडे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.वरील काळात वाघमोडे, उघडे,माने,सरोदे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.काल्याच्या किर्तना नंतर गावातील हनुमान मंदिरा शेजारी संत बाळूमामा यांच्या मंदिराचा भुमीपुजन सोहळा ह.भ.प.सुरेशानंद महाराज कोळेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी युवा नेते भाऊसाहेब उघडे, शंकरराव उघडे, सदाशिव वाघमोडे, शिवाजी उघडे, कृष्णा वाघमोडे, संभाजी उघडे, म्हातारदेव उघडे,धर्मा वाघमोडे, म्हातारदेव वाघमोडे,पोपट वाघमोडे,पोपट उघडे,ह.भ.प. अंकिता डांगे इत्यादी मान्यवरासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मंदिरासाठी परीसरातील भाविक भक्तांनी या मंदिराच्या बांधकामा साठी आर्थिक मदत करावी असे आवाहन कोपरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.























