Home महाराष्ट्र “महाराष्ट्र हादरला” अंघोळ करतानाचे फोटो काढून मुलीवर 10 वर्षे अत्याचार, पीडितेनं कुटुंबासह...

“महाराष्ट्र हादरला” अंघोळ करतानाचे फोटो काढून मुलीवर 10 वर्षे अत्याचार, पीडितेनं कुटुंबासह गाव सोडलं, तरी नराधम छळत राहिला

महाराष्ट्र हादरला! अंघोळ करतानाचे फोटो काढून मुलीवर 10 वर्षे अत्याचार, पीडितेनं कुटुंबासह गाव सोडलं, तरी नराधम छळत राहिला

 

एका अल्पवयीन मुलीचे अंघोळ करतानाचे विवस्त्र फोटो काढून, त्या आधारे तिला तब्बल दहा वर्षे ब्लॅकमेल केलं असून नराधमाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.

 

 

जालना: जालना जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अंघोळ करतानाचे विवस्त्र फोटो काढून, त्या आधारे तिला तब्बल दहा वर्षे ब्लॅकमेल केलं असून नराधमाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं केवळ शारीरिक शोषणच केलं नाही, तर पीडितेवर हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी अमानुष दबाव टाकल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी शेख इम्रानसह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

नेमकी घटना काय?

पीडित तरुणी सध्या २५ वर्षांची असून, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार २०१६ पासून सुरू होता. पीडिता मूळची वालसावंगी (ता. भोकरदन) येथील रहिवासी आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये ती नववीत शिकत होती. त्यावेळी ती घरात कोणीही नसताना बाथरुममध्ये अंघोळ करत होती. हीच संधी साधून आरोपी शेख इम्रान शेख हबीब (वय ३७) याने घरात घुसून तिचे विवस्त्र फोटो काढले. हे फोटो शाळेत दाखवून बदनामी करण्याची धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या जाचाला कंटाळून पीडितेचे कुटुंब २०१७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित झालं, मात्र आरोपीनं तिथेही तिचा पिच्छा सोडला नाही. मार्च २०१८ मध्ये फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला.

 

धर्मांतरासाठी अमानुष छळ आणि बुरख्याची सक्ती

या गुन्ह्यात केवळ मुख्य आरोपीच नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंब सामील असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपीने पीडितेला कुराण देऊन नमाज पठणाची सक्ती केली. जून २०१८ मध्ये पीडिता पुन्हा वालसावंगी येथे आली असता, आरोपीचे वडील शेख हबीब, आई शेख बानू आणि भाऊ शेख जुनेद यांनी तिला घरी बोलावून “हिंदू धर्मापेक्षा आमचा धर्म चांगला आहे” असे म्हणत तिला बळजबरीने बुरखा घालायला लावला. तिला सतत धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केले जात होते.

 

मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

गेल्या १० वर्षांपासून हा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच होता. ८ मार्च २०२६ रोजी आरोपीने पुन्हा सर्व मर्यादा ओलांडल्या. जालन्यातील जागडनगर भागात पीडितेच्या घरात घुसून आरोपीने तिला अमानुष मारहाण केली आणि तिचे फोटो व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या जाचाला कंटाळून पीडितेने हिंमत एकवटली आणि पोलिसांत धाव घेतली.

 

 

पोलिसांची कारवाई

 

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी शेख इम्रानसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर ‘पोक्सो’ (POCSO) आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Don`t copy text!