Home पाचोरा पाचोरा पोलिसांची धडक कारवाई : दोन चोरीचे गुन्हे तीन तासांत उघड, मुद्देमाल...

पाचोरा पोलिसांची धडक कारवाई : दोन चोरीचे गुन्हे तीन तासांत उघड, मुद्देमाल हस्तगत

पाचोरा पोलिसांची धडक कारवाई : दोन चोरीचे गुन्हे तीन तासांत उघड, मुद्देमाल हस्तगत

 

 

पाचोरा : पाचोरा पोलिसांनी जलद व प्रभावी कारवाई करत दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघडकीस आणत मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि. 16 एप्रिल 2026 रोजी नय्यूम जहागीर देशमुख (व्यवसाय – इलेक्ट्रिक दुकान, रा. अक्सानगर, जारगाव ता. पाचोरा) यांच्या दुकानातून सुमारे 94,500/- रुपये किंमतीचे तीन गोडरेज कंपनीचे ए.सी. अज्ञात चोरट्यांनी 01 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत चोरी करून नेले होते. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 177/2026, भा.दं.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी मा. पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी रिहान हमीश शहा (वय 22, रा. हनुमाननगर, पाचोरा) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 94,500/- रुपये किंमतीचे तीन ए.सी. जप्त करण्यात आले.
तसेच दि. 15 एप्रिल 2026 रोजी नोंद झालेल्या आणखी एका चोरीच्या गुन्ह्यात (गु.र.नं. 174/2026) 30,000/- रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
पाचोरा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दोन्ही गुन्ह्यांतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच या कारवाईमुळे गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसला आहे.

Don`t copy text!