जळगाव जिल्ह्यात ‘शिक्षण उत्सव’ कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न

जळगाव जिल्ह्यात ‘शिक्षण उत्सव’ कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न

 

जळगाव जिल्ह्यात आयोजित शिक्षण उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक ऊर्जेत पार पडला. या कार्यक्रमाला

जळगाव जिल्हाधिकारी माननीय श्री रोहन घुगे साहेब,

 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माननीय श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम,

 

Deputy CEO माननीय श्री एम. टी. चौधर साहेब,

 

डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय श्री चंद्रकांत साळुंखे साहेब,

 

उपशिक्षणाधिकारी माननीय श्री नरेंद्र चौधरी साहेब,

 

उपशिक्षणाधिकारी माननीय श्री विजय सरोदे साहेब,

 

उपशिक्षणाधिकारी माननीय श्रीमती स्वाती हवेले मॅडम,

 

डाएट अधिव्याख्याता माननीय श्री जगन्नाथ दरंधले साहेब,

 

तसेच तालुका स्तरावरील अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम शिक्षकांसाठी केवळ एक उपक्रम न राहता, एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

 

शिक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच शिक्षण उत्सवाचा खरा यशाचा मापदंड ठरला.

 

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, अधिकारी वर्ग आणि शिक्षक एकाच टेबलावर बसून मुक्तपणे संवाद साधत, अनुभवांची देवाणघेवाण करताना दिसले. प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील ही समतोल, आपुलकीची आणि संवादप्रधान भूमिका शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आशादायी दिशा दाखवणारी ठरली.

 

असा सकारात्मक, प्रेरणादायी आणि सहभागी दृष्टिकोन असलेला शिक्षण उत्सव जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालीला नवी उंची देणारा ठरला.