Home जळगाव दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ...

दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ संपन्न

दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ संपन्न

 

 

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे SQAAF A ग्रेड प्राप्त दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय चोपडा येथील इयत्ता बारावी वर्गाच्या निकालाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. यंदा देखील यशाची परंपरा राखत महाविद्यालयाचा ९६.६७% निकाल लागला असून, विज्ञान शाखा ९८.६३%, वाणिज्य शाखा ९७.७५%, कला शाखा ९०.००% या प्रमाणे शाखा निहाय निकाल लागला आहे.

*विज्ञान शाखेत* प्रथम तेजस रोहित माळी ८९.५०%, द्वितीय सूर्यकांता संदीप पाटील ८८.६७% तृतीय रिधिमा विजय सोनवणे ८८.००%, प्रथम गुरुदास पाटील ८८.००% *वाणिज्य शाखा* प्रथम केदार गोपाल लोहार ९२.३३%, द्वितीय कृष्णा दीपक बावा ८८.३३, तृतीय माही निलेश गुजराथी ८७.१७% *कला शाखा* प्रथम प्राजक्ता प्रशांत गुरव ८६.१७%, द्वितीय भाग्यश्री बाळू कोळी ८१.१७%, तृतीय गौरी संजय धनगर ७५.८३%

प्रथम गुरुदास पाटील व आर्यन भारत कुमार सपकाळ यांनी JEE (MAIN) परीक्षेत अनुक्रमे ९९.२२ व ९८.१५पर्सेंटाइल प्राप्त केले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे *संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील सचिव ताईसाहेब डॉ.स्मिता संदीप पाटील,प्राचार्य प्रा.डॉ. संध्या महेंद्र सोनवणे* यांच्या हस्ते महाविद्यालयात दिनांक ४ मे २०२६ रोजी स्मार्ट हॉल येथे सकाळी साडेदहा वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करून, सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला *उपप्राचार्य श्री.पी.एस.पाडवी* यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची,तसेच महाविद्यालयात संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा व इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भात उपस्थितांना माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात *भैय्यासाहेब अँड.संदीप पाटील* यांनी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे कौतुक केले,तसेच अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात व येणाऱ्या काळात शिक्षणाबरोबर सजग नागरिक होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी *समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, रजिस्ट्रार श्री. डी.एम.पाटील* यांच्यासह गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री.विवेकानंद देवानंद शिंदे* यांनी केले,तर आभार पर्यवेक्षक *श्री.ए.एन.बोरसे* यांनी मानलेत.

Don`t copy text!