प्रकाश तेली यांचा उत्कृष्ट साहित्य कार्याबद्दल सन्मान
जळगाव:- दि. १४ जुलै रोजी सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल, युवा विकास फाउंडेशन जळगाव द्वारा आयोजित यशवंत गुणगौरव सोहळ्यात प्रकाश तेली यांचा उत्कृष्ट साहित्य कार्याबद्दल शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात पीएचडी धारक, उच्च पदवी व पदविका धारक, अन्य क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या तसेच दहावी व बारावीतील १५३० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे माजी पालकमंत्री मा.गुलाबरावजी देवकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, आय.एम.ए.जळगावचे माजी अध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, प्रदेश युवा सरचिटणीस मा.धनंजय चौधरी, डॉ.राजेश पाटील, माजी महापौर विष्णू भाऊ भंगाळे, मा.वाल्मिक पाटील, प्राचार्य.डॉ.प्रशांत वारके, डॉ.इंदिरा पाटील, डॉ.सागरमल डाकलिया, मा.रजनीश पारधीस, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल रो.दिनेश थोरात, रो.समर्थ पाटील, संचालक ग.स.सोसायटी मा.महेश पाटील सर, पियुष गांधी, योगिता प्रकाश तेली तसेच इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कशाबद्दल झाला प्रकाश तेली यांचा सत्कार :- प्रकाश तेली हे साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असून त्यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक विषयांवर 5000 कविता व 7000 स्लोगन्स हे लिहिले असून त्यांनी काव्य व स्लोगन लेखनाचा जागतीक विक्रम केलेला असून त्यांच्या कार्याची नोंद ही एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झालेली आहे त्यांच्या ह्या अनोख्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.