Home पाचोरा श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त युवा नेते मा. सुरज...

श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त युवा नेते मा. सुरज वाघ यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त युवा नेते मा. श्री. दादासाहेब सुरज वाघ यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

 

 

 

 

पाचोरा दि. 07 -पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा, गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था पाचोरा-भडगाव, माय भारत केंद्र जळगाव व सामाजिक वनीकरण विभाग पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 05 जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात युवा नेते व पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते मा. श्री. दादासाहेब सुरज संजय वाघ, प्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा. श्री. अभिषेक चवरे, महाराष्ट्र शासनाच्या यशदा प्रशिक्षण संस्थेचे मास्तर ट्रेनर मा. श्री. नितीन नेरकर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल मा. श्री. जी. आर. बडगुजर, वनपाल मा. श्री. उल्हास एस. पाटील, मा. श्री. योगेश जी. दीक्षित, मा. श्री. रवींद्र एल. ठोसर व गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्थेचे मा. श्री. ए. जी. महाजन, मा. श्री. आनंद नवगिरे यांच्या शुभहस्ते कडूलिंब, करंज, वड व पिंपळ अशा वृक्षांची लागवड करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ व ‘पर्यावरण संवर्धना’चा संदेश दिला.

यावेळी वनरक्षक श्री. प्रकाश पाटील, श्री. निलेश पाटील, गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्थेचे श्री. आर. पी. बागुल, सौ. विद्या कोतकर, डॉ. भरतकुमार प्रजापत, श्री. एकनाथ संदानशिव, श्री. अशोक मोरे, श्री. संजय कोतकर, प्रा. डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. शुभम राजपूत, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अमित गायकवाड, श्री. राजेंद्र पाटील, श्री. प्रवीण खेडकर, श्री. दीपक सूर्यवंशी व 40 स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था, माय भारत केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!