शैक्षणिक वर्षाची होणार प्रवेशोत्सवाने सुरुवात पाचोरा शिक्षण विभाग सज्ज
पाचोरा -पाचोरा पंचायत समिती शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे आवश्यक नियोजन केल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी कळवले आहे.
नवीन पाठयपुस्तके वाटप नियोजन –
जिल्हा परिषद व अनुदानित शाळांना इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत पाठयपुस्तके शाळा स्तरावर पोच करण्याची कार्यवाही सुरु असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्यात येतील.एक लाख पन्नास हजार सातशे तेरा पुस्तके प्राप्त झाली असून वितरण सुरु आहे.
प्रवेशोत्सव -पहिल्या दिवशी नवीन विदयार्थ्यांचे स्वागत, शाळा सजावट, मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ इत्यादी उपक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निपुण अभियान आढावा सभा –
11 जून रोजी तालुकास्तरीय आढावा सभा सर्व शिक्षकांची घेण्यात येणार आहे. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील हे मार्गदर्शन करणार आहे. सकाळी दहा वाजता महालपुरे मंगल कार्यालय पाचोरा येथे सभा होणार आहे.
जागतिक योग दिवस -21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त तालुक्यातील सर्व 257 शाळेतील सुमारे साठ हजार विद्यार्थी शाळेमध्ये योगा करणार आहेत.
यू -डायस पोर्टल वर विद्यार्थी प्रमोशन 80% पूर्ण झाले असून विद्यार्थी अपार आय डी कामकाज 90% पूर्ण आहे.
सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रम -शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये तालुक्यात सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम घेण्याचे नियोजन आहे. पाठयपुस्तक वितरण साठी शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, गट समन्वयक जितेंद्र पाटील,केंद्र प्रमुख अनिल पाटील,सखाराम महाजन, अभिजित खैरनार, ज्ञानेश्वर पाचोळे, शांताराम वानखेडे, कदीर सर,मोराणकर सर,कैलास बडगुजर, प्रकाश पाटील, घनशाम चौधरी, लहू पवार, रावसाहेब साळुंखे, जयदीप पाटील, दिलीप पाटील, गिरीष भोयर, सुनील शिवदे व विशेष शिक्षिका परिश्रम घेत आहेत.

























