Home महाराष्ट्र शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गलवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गलवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गलवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

 

 

 

सोयगाव दत्तात्रय काटोले

सोयगाव, दि. ६ (प्रतिनिधी) शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गलवाडा ग्रुपग्रामपंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुढी उभारून भगवा ध्वज फडकावण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच फिरोज पठाण, राहुल इंगळे, संतोष बिऱ्हारे, रवी मंडवे, लखन इंगळे, दिनेश माजाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Don`t copy text!