Home महाराष्ट्र अपघातविरहित सेवेसाठी चालक इरफान तडवी यांचा सन्मान

अपघातविरहित सेवेसाठी चालक इरफान तडवी यांचा सन्मान

अपघातविरहित सेवेसाठी चालक इरफान तडवी यांचा सन्मान

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले l

सोयगाव, दि. ७ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सोयगाव आगारातील चालक इरफान इस्माईल तडवी बिल्ला क्र.१९७०० यांचा अपघातविरहित सेवेसाठी सन्मान करण्यात आला. तब्बल २६ वर्षांहून अधिक काळ सुरक्षित व शिस्तबद्ध सेवा बजावत प्रवाशांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

 

छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत सोयगाव आगारात कार्यरत असलेल्या तडवी यांनी आपल्या सेवाकाळात उत्कृष्ट कर्तव्यदक्षता, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित वाहनचालनाचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना सन्मानपत्र व २५००० रु चा चेक देऊन गौरविले.

 

या सन्मानामुळे सोयगाव आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Don`t copy text!