पुण्यातील पश्चिम विभागीय पिकलबॉल स्पर्धेत चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी २३ पदके प्राप्त करीत केली ऐतिहासिक कामगिरी
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील खेळाडूंनी पुणे येथे दिनांक २९ आणि ३० मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या All India picklball Association chya ‘पश्चिम विभागीय पिकलबॉल चॅम्पियनशिप’ (West Zone Pickleball Championship) स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आहे. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित सह्याद्री स्पोर्ट्स चोपडा यांच्या खेळाडूंनी या स्पर्धेत तब्बल २३ पदकांची लयलूट करत चोपड्याचे नाव क्रीडा जगतात मानाने उंचावले असून क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत दबदबा निर्माण केला आहे.
याप्रसंगी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेत सर्वाधिक ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ५ पदके पटकावत अंजली पोळ या विद्यार्थिनीने निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने १८ वर्षांखालील (Under-18) एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी आणि ओपन प्रो एकेरी व महिला दुहेरी गटात ही पदके मिळवली.कलश क्षीरसागरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत इंटरमीडिएट एकेरी, दुहेरी, १४ वर्षांखालील एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी या श्रेणींमध्ये एकूण ५ पदके आपल्या नावावर केली. तसेच जिनीषा क्षीरसागर हिने १८ वर्षांखालील मुलींच्या गटात १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ४ पदके जिंकली.निकिता सोनवणे या खेळाडूने इंटरमीडिएट एकेरी, दुहेरी आणि १८ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात एकूण ३ पदके पटकावली. तर दिव्या तोतला हिने १२ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सुवर्ण आणि १२ वर्षांखालील एकेरी गटात रौप्य पदक मिळवून दिव्याने दुहेरी यश संपादन केले.हर्ष जाधव याने १२ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सुवर्ण आणि १२ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात कांस्य पदक जिंकले.स्वरा सोनवणे हिने १२ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात सुवर्ण आणि मिश्र दुहेरी गटात कांस्य पदक पटकावले.ऐश्वर्या तोतला हिने १४ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी आणि इंटरमीडिएट महिला दुहेरी गटात ऐश्वर्याने २ कांस्य पदके मिळवली.कनक जैन या खेळाडूने इंटरमीडिएट महिला दुहेरी आणि महिला एकेरी गटात २ कांस्य पदके आपल्या नावावर केली.रोहन पाटील याने मुलांच्या इंटरमीडिएट दुहेरी गटात अप्रतिम खेळ करत १ सुवर्ण पदक पटकावले.कशिश महाले याने इंटरमीडिएट एकेरी श्रेणीत १ कांस्य पदक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
खेळाडूंच्या या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाबद्दल तसेच स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ आणि सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आहे.
या सर्व खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि खडतर प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक भूपेंद्र पोळ यांचे यावेळी विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडूंनी हे यश संपादन केले असल्याचे बोलले जात आहे.या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ. एल. बी. पटले यांनी केले. खेळाडूंच्या या यशामुळे संपूर्ण चोपडा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

















