Home महाराष्ट्र औरंगपूरच्या आदिवासी महीलेवर झालेल्या अत्याचारांचा वंचितच्या आंदोलना नंतर अखेर पावणेचार महिन्यानी गुन्हा...

औरंगपूरच्या आदिवासी महीलेवर झालेल्या अत्याचारांचा वंचितच्या आंदोलना नंतर अखेर पावणेचार महिन्यानी गुन्हा दाखल

औरंगपूरच्या आदिवासी महीलेवर झालेल्या अत्याचारांचा वंचितच्या आंदोलना नंतर अखेर पावणेचार महिन्यानी गुन्हा दाखल

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या तीव्र आंदोलना नंतर अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर येथे आदिवासी महीलेवर झालेल्या सामूहिक अत्याचारांचा पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ६१८/२०२६ भारतीय न्याय संहितेचे कलमं ७०(१),७४,११९ (१),११५(२),३५१(२),३५१(३),३५२, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१),(r),३(१)(w)(i) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगपूर येथिल पिडीत आदिवासी महीलेने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की मी पिडीत(भिल्ल)आदिवासी समाजाची महीला आहे .(वय वर्षे ४२) मी औरंगपूर,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथे माझी वृद्ध आई शशिकला माळी (वय वर्षे ७५)हीच्या सोबत घरात राहते. माझा मुलगा प्रसाद युवराज म्हस्के हा पुणे येथे शिक्षण घेत आहे. तो कधीतरी सुटीच्या दिवशी घराकडे येत असतो.मी मोलमजुरी करून माझी उपजिवीका भागविते.मझ्या शेजारी प्रभाकर सुधाकर किलबीले यांचे कुटुंब राहण्यास आहे.हे कुटुंब शेतीच्या कारणांमुळे आम्हाला नेहमीच त्रास देतात.१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मी आणि माझी आई शशिकला माळी दोघीजणी आमच्या घरात झोपलेल्या अवस्थेत असताना रात्री अचानक आमच्या घरावर दगड फेकण्याचा आवाज आला.आम्ही झोपेतून जागे झालो असता आम्ही आमच्या घराच्या खिडकीला लावलेला पडदा पेटत होता असे पाहीले.व बाहेर आमच्या कुत्र्याचा जोर जोराने भुंकण्याचा आवाज येत होता.आम्हाला वाटले चोर आले असावे म्हणून आम्ही आमच्या घराचा दरवाजा उघडला असता बाहेर शेजारी राहणाऱ्या किलबिले कुटुंबासह एकुण चौदा लोक घरात घुसले.त्यापैकी दिनकर गंगाधर किलबिले यांनी माझ्या अंगातील गाउन फाडून माझी छाती दाबली.कृष्णा सुधाकर किलबिले यांनी माझे दोन्ही हात धरले व प्रभाकर सुधाकर किलबीले यांने माझे व त्याच्या स्वतःच्या अंगावरील कपडे काढून माझ्या वर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.त्यानंतर सारंगधर उत्तम किलबिले यांने देखील त्याच्या अंगावरील कपडे काढून माझ्या वर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.त्यानंतर निखिल माने, अमोल मच्छिंद्र कोठे,अभिषेक दिलिप किलबिले, दिलिप तुकाराम किलबिले,आनंद भाऊसाहेब कासुळे,भिमराव ज्ञानदेव किलबिले,सुभाष गोविंद किलबिले, यांनी आमच्या घरातील डबे उचका पाचक करून मी ठेवलेल्या डब्यातील (३,००,०००) तिन लाख रुपये घेऊन गेले.तसेच ईश्वर बापुसाहेब देशमुख यांनी असे म्हटले की तुम्ही जर आमच्या वर गुन्हा दाखल केला तर आम्ही तुमच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकू‌. वरील सर्व जण आम्हाला असे म्हणाले की भिलट्यांनो आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून आम्हाला जातीवाचक शिविगाळ केली.व म्हणाले की तुम्ही आम्हाला तुमची जमीन दिली नाही तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी देऊन तेथुन निघुन गेले.त्या नंतर २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मी आणि माझी आई शशिकला माळी असे आम्ही दोघीही घरात काम करीत असताना मनिषा सुधाकर किलबीले व तीचे वडील (नाव माहीत नाही) हे आमच्या घरामध्ये आले.मनिषा सुधाकर किलबीले हीने माझी आई शशिकला माळी (वय वर्षे ७५) हीस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.व तीच्या वडीलांनी माझ्या आईच्या गळ्यात असलेले दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, दोन मोबाईल,एक लॅपटॉप आमच्या घरातून काढून घेऊन गेले आहेत.सदर मोबाईल मध्ये वरील झालेल्या सर्व घटनेचे शुटींग व व्हिडिओ आहेत.मनिषा किलबिले व तीच्या वडीलांनी मला भिलाच्या बाया रांडा आहेत असे म्हणून शिविगाळ करून आमची मानहानी केली. जरी तुम्ही आमच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली तरी आमचे काहीच होऊ शकत नाही माझा भाउ अमुक तमुक आहे.तो आम्हाला कोठूनही सोडून आणील असे म्हणून शिविगाळ करीत निघून गेले ‌आहेत म्हणून माझी१) दिनकर गंगाधर किलबिले,२) प्रभाकर सुधाकर किलबीले,३) कृष्णा सुधाकर किलबीले,४) सारंगधर उत्तम किलबिले,५) अमोल मच्छिंद्र कोठे,६)निखिल माने,७)जयदत्त उत्तम किलबिले,८) अभिषेक दिलिप किलबिले,९) दिलिप तुकाराम किलबिले,१०) भिमराव ज्ञानदेव किलबिले,११) ईश्वर बापुसाहेब देशमुख,१२) सुभाष गोविंद किलबिले,१३) आनंद भाऊसाहेब कासुळे,१४)शुभम माने,१५) मनिषा सुधाकर किलबीले,१६) मनिषा सुधाकर किलबीले हीचे वडील(नाव गाव माहीत नाही)अशा सोळा लोकांच्या विरोधात पिडीतेने वरील आषयाची फिर्याद दाखल केली आहे.वरील गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यासाठी पिडीता व तीच्या मुलाने अहिल्या नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिन दिवस उपोषण केले होते तेव्हा वरीष्ठांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ही फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.त्याचवेळी तेथे अहिल्या नगर येथे पिडीते सोबत बसलेले उपोशनार्थी प्रसाद युवराज म्हस्के,विठ्ठल रावसाहेब खर्चन, हे दोघेही उपस्थित होते. पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ऑनलाईन फिर्यादीची नोंदणी सुरू असताना तेथे औरंगपूर येथिल १५/१६ लोक आले व म्हणाले की आमचीही पिडीता,प्रसाद म्हस्के,आणि विठ्ठल खर्चन यांच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल करून घ्या.पोलीसांनी सांगितले होते की तुमचीही फिर्याद दाखल करण्यात येईल. बलत्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याचा धक्का सहन न झाल्याने विठ्ठल रावसाहेब खर्चन राहणार आखेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हे वंचित आघाडीचे कार्यकर्ते जागीच चक्कर येऊन खाली पडले.त्यांना उपचारासाठी पाथर्डी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मयत खर्चन हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते.मग वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते किसनराव चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली मयत खर्चन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीसावरच सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून पाथर्डी येथे आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी चौकशी समिती नेमून मयतास न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयतावर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका घेत पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता.व पोलिस स्टेशनच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले होते.वंचितचे म्हणणे आहे की दोषींवर कारवाई झाली पाहिजे.ही चौकशी होईपर्यंत पोलिस अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करावी.त्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका घेऊन पाथर्डी तील वसंतराव नाईक चौकात अजूनही आंदोलन सुरूच आहे.या संदर्भात अहिल्या नगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब हे पाथर्डी येथे दाखल झाले होते.त्यांनी वंचित आघाडीच्या आंदोलकांशी चर्चा केली होती. औरंगपूर येथिल महिलेवर अत्याचाराचा आरोप झाल्यामुळे त्यांनी तातडीने पाथर्डी पोलिस स्टेशनला भेट दिली होती.त्यांच्या समवेत शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब व शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे आवर्जून उपस्थित होते.त्यांच्यात चर्चा झाली होती.यावेळी वंचित आघाडीचे नेते किसनराव चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या कानावर ही या घडलेल्या घटनेचा वृतांत कथन करण्यात आला आहे.या सामुहिक अत्याचारांच्या गुन्ह्याच्या उशिरा नोंदीच्या घटनेमुळे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या मुळे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाथर्डीतील आंदोलनात वंचितचे राज्य संपर्क प्रमुख ॲडव्होकेट अरूण जाधव,प्राध्यापक किसनराव चव्हाण,शेवगाव अध्यक्ष प्यारेलाल शेख,किसनराव आव्हाड,अरविंद सोनटक्के, निखिल खर्चन, अंबादास आरोळे, वसंतराव बोर्डे,बाबा राजगुरू, हे सहभागी झाले आहेत.एकंदरीत या प्रकरणामुळे पाथर्डी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Don`t copy text!